Video Podcast on Digital Marketing in Marathi
मराठीतून डिजिटल मार्केटिंग

आज आपण ज्या डिजिटल युगात राहतो त्यात डिजिटल माध्यम, डिजिटल मार्केटिंग, हे सर्व जाणणं अत्यंत जरूरी आहे. मराठीमध्ये हे चॅनेल चालू करण्यामागचा उद्देश असा आहे की इंग्रजीमध्ये बरीच चॅनेल्स आहेत, बराच कॉन्टेन्ट इंटरनेट वरती मिळतो, मात्र मराठीमध्ये चांगला कॉन्टेन्ट असला तरी त्या मानाने कमी आहे.

तर आपल्या सर्वांसाठी डिजिटल माध्यम आणि डिजिटल मार्केटिंग हा विषय अगदी सविस्तरपणे सांगण्याचा हा माझा प्रयत्न आहे. माझा गेल्या तीस वर्षाचा या डिजिटल माध्यमांचा अनुभव, आणि माध्यमातील पीएचडी डिग्री या चॅनेल साठी कामाला येईल अशी आशा करतो. मी फक्त डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल माध्यम एवढ्यावरच वी-लॉग न बनवता, डिजिटल मार्केटिंगला उपयुक्त असे ग्राफिक डिझाईनिंग, वेब डिझाईनिंग सारखेही विषय हाताळणार आहे. आज दुपारी चार वाजता या चॅनेलचा लॉन्च आहे आपण जरूर माझ्या या नवीन चॅनलला भेट द्यावी, लाईक, शेअर, आणि सबस्क्राईब करावे आलो सबस्क्राईब करावेत आणि मुख्य म्हणजे तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा!

मराठीतून डिजिटल मार्केटिंग

आपण सर्व विडिओ इथेही पाहू शकता

पॉडकास्ट व्यतिरिक्त आम्ही काय करतो?

आम्ही मोबाईल फिल्ममेकिंग, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंगची वर्कशॉप आयोजित करतो. आमच्या होम पेजला जरूर भेट द्या.



होम पेजची लिंक : इथे क्लिक करा